जरे हत्याकांडाचा खटला  द्रुतगती न्यायालयात चालवा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरे हत्याकांडाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.

राहाता नगरपरिषद विकास कामात राज्यात अव्वल राहील : पालकमंत्री विखे 
राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
भारताची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत दुसर्‍या क्रमांकाची होईल : कडलग

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

जरे यांची दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला असून पत्रकार बाळ ज. बोठे याने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी बोठेसह इतर आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेची निर्घृण हत्या होणे ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, असे अ‍ॅड. लगड यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS