हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारणार – आ.नरेंद्र भोंडेकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारणार – आ.नरेंद्र भोंडेकर

नगर - प्रतिनिधी महाराष्ट्रातील तमाम हिंदू दलितांची वज्रमूठ तयार करुन खाटीक, चर्मकार, वाल्मिकी, मातंग समाजाला त्यांचा संवाधिनिक अधिकार मिळून देण्या

मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील दोन्ही काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद करावा
पांढऱ्या कपड्यातील साखर कारखानदार सर्वात मोठे दरोडेखोर ; शेट्टी
कानडगाव येथे सशस्त्र दरोडा

नगर – प्रतिनिधी

महाराष्ट्रातील तमाम हिंदू दलितांची वज्रमूठ तयार करुन खाटीक, चर्मकार, वाल्मिकी, मातंग समाजाला त्यांचा संवाधिनिक अधिकार मिळून देण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. त्यासाठी हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

हिंदू दलित महासंघाची पुणे विभागीय बैठक व चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी आ.भोंडेकर बोलत होते. कार्यक्रमास महासंघाचे कार्याध्यक्ष चरणसिंग टाक, महासचिव जयसिंग कछवाह, उपाध्यक्ष प्रकाश चमके, शंकरराव वानखडे, संजय धनाडे आदिंसह नगर मधील विजय घासे, भगवान शिंगरे, अक्षय धन्ने आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

याप्रसंगी नगरचे विजय घासे म्हणाले,  हिंदू दलित महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महासंघाचे कार्य वाढविण्यात येणार आहे.  सर्वसामान्यांना न्याय मिळण्याकरीता शासनाला भाग पाडण्याची भुमिका राहील. यासाठी जिल्हा पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्यात येईल, असे सांगितले.

प्रास्तविक जयसिंग कछवाह यांनीकेले तर योगेश भागवत यांनी आभार मानले.

COMMENTS