घरकाम करणार्‍या महिलांसाठी स्टार्ट अप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकाम करणार्‍या महिलांसाठी स्टार्ट अप

कोरोना विषाणूच्या संकटकाळात घरकामकरणार्‍या अनेक महिला कामगारांची होरपळ झाली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी घरकाम करणार्‍या महिलांना सुट्टी दिली आहे.

कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे
शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पाटील लढत रंगणार

पुणे/प्रतिनिधीः कोरोना विषाणूच्या संकटकाळात घरकामकरणार्‍या अनेक महिला कामगारांची होरपळ झाली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी घरकाम करणार्‍या महिलांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे घरकाम करणार्‍या महिला कोरोना विषाणूबाबत योग्य काळजी घेतात की नाही? यामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. या दोन्ही बाजूंची समस्या लक्षात घेऊन पुण्यातील एका दाम्पत्याने अनोखे स्टार्टअप सुरू केले आहे. त्यामुळे अनेक असंघटीत कामगार महिलांच्या रोजगाराचा प्रश्‍न मिटला आहे. 

शहरातील शेकडो लोकांना कोरोना प्रादुर्भावाबद्दल योग्य माहिती असणारी महिला घरकामासाठी उपलब्ध झाली आहे. कोरोना काळात घरकाम करणारी मावशी योग्य काळजी घेतात का? कोरोनाबाबतची साफसफाई त्यांना करता येते का? तसेच मावशींना कोरोना तर नाही ना? अशा अनेक समस्या नागरिकांना पडत आहेत. अशा सर्व समस्यांचे उत्तर पुण्यातील या स्टार्टअपने दिले आहे. तसेच घरकाम करणार्‍या या असंघटित महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. 20 वर्षांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात सल्लागार पदावर काम केल्यानंतर मंदार घुगरी आणि त्यांच्या पत्नी सुनीता घुगरी यांनी गेल्यावर्षी मार्चमध्ये हे अनोखे स्टार्टअप सुरू केले आहे. या स्टार्टअपचे नाव मेड इझी असे आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून घुगरी यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील शंभराहून अधिक नागरिकांना महिला घरकामगार पुरवल्या आहेत, तर आत्तापर्यंत 200 हून अधिक महिलांनी या स्टार्टअपमध्ये स्वतःची नाव नोंदणी केली आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक घरकामगार महिलांना संघटित करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर घरकाम करण्यापासून कामाच्या ठिकाणी कसे वागावे, याचे प्रशिक्षणही कंपनीकडून देण्यात येत आहे. तसेच कामावर रुजू होण्यापूर्वी संबंधित महिला कामगाराची वैद्यकीय तपासणी केली जाते. गरज पडल्यास संबंधित महिलेची महिलेची पोलिसांकडून गुन्हेगारी पार्श्‍वभूमीदेखील तपासली जाते. किती आणि काय काम आहे, त्यानुसार महिलांना पगार पुरवला जातो. अशा महिला कामगारांमुळे अनेक नागरिकांची कोरोना बाबतची धास्ती कमी झाली आहे.

COMMENTS