जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांचे गृहविलगीकरण करणार ; अजित पवार यांचा इशारा ; बाधितांची संख्या कमी होत नसल्याने उपाय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांचे गृहविलगीकरण करणार ; अजित पवार यांचा इशारा ; बाधितांची संख्या कमी होत नसल्याने उपाय

शहरात शनिवार आणि रविवारी वीकएंडला कडक निर्बंध राहतील. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

लग्नाआधीच अभिनेत्री इलियाना डिक्रूजने दिली गुड न्यूज
मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्येच होणार
माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू : धैर्यशील माने | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी : शहरात शनिवार आणि रविवारी वीकएंडला कडक निर्बंध राहतील. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बाधित रुग्ण दर कमी न झाल्यामुळे निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. अन्यथा, जिल्ह्याबाहेर जाणार्‍या नागरिकांना गृहविलगीकरण करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

    पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ’’अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असताना तेथे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चाहूल लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 53 टक्के लोकांचा मृत्यू हा साठ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांचा झाला आहे. त्यापैकी 20 टक्के मृत्यू 30 ते 45 वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनीही गांभीर्याने घेतले पाहिजे. पुणे महापालिकेकडूनही अशा स्वरूपाचा अहवाल मागवला आहे. काहीजण पुण्यातून महाबळेश्‍वर तसेच परराज्यात फिरण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी परराज्यांत गेलेल्या नागरिकांना पुण्यात आल्यानंतर 15 दिवस विलगीकरणात ठेवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. ’’केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाचे नियोजन केले आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्यात दररोज दीड लाख लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु केंद्र सरकारकडून अद्याप लस प्राप्त झालेली नाही. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर हे लसीकरण करणे शक्य होईल. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही जाऊन लस देता येईल,’’ अशी माहिती पवार यांनी दिली.

’’जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशील्ड लस घेतलेल्या व्यक्तींना परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे; परंतु कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या व्यक्तींना परवानगी नाही. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर परदेशी जाण्यासाठी पुन्हा कोव्हिशील्डची लस घेऊ नये,’’ असे तज्ज्ञांचे मत असल्याचे पवार यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावात संपूर्ण लसीकरण झाले आहे. देशातील हे पहिले असे गाव असून, या गावातील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे, असे पवार यांनी सांगितले.

आषाढी वारीबाबत मार्ग निघेल

पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत यापूर्वीच आदेश काढण्यात आले आहेत; मात्र वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसोबत अद्याप विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची चर्चा सुरू असून, लवकरच मार्ग काढण्यात येईल. वारीबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

COMMENTS