Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’

कोपरगाव प्रतिनिधी - येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवा

हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांचे डोळे काढू ; नितेश राणे
मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात
अहमदनगर येथे मराठी नव वर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने

कोपरगाव प्रतिनिधी – येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त ’कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. 06 डिसेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत संपन्न होणार्‍या या कृतज्ञता सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात निबंध स्पर्धा, आरोग्य व स्वच्छता, माता -पालक मेळावा, वृक्षारोपण, रांगोळी-चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा,व्याख्यान इ. कार्यक्रम घेण्यात येणार असून विविध कार्यक्रमांनी भरगच्च असा हा ‘कृतज्ञता सप्ताह’ संपन्न होणार आहे.


12 डिसेंबर 2022 रोजी होणार्‍या समारोपपर व्याख्यान कार्यक्रमासाठी  भास्करराव पेरे पाटील, माजी आदर्श सरपंच- पाटोदा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षपद  रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन भगीरथ शिंदे हे भूषविणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष काळे, अशोकराव काळे, बिपिनदादा कोल्हे, संदीप वर्पे, पद्मकांत कुदळे, कारभारी आगवन, मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम, अरुण चंद्रे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक कोल्हे, चैतालीताई काळे, सुनील गंगुले इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी केले आहे.

COMMENTS