Beed : महापुरामुळे उमरी गाव पाण्याखाली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : महापुरामुळे उमरी गाव पाण्याखाली

माजलगाव तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे उमरी गावच्या नदीला महापूर आल्याने  गाव पुर्णतः पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस

सत्ता जाण्यापूर्वीच सांत्वनपर भाषण | LokNews24
बीड जिल्ह्यातील संपूर्ण पिके करपली असुन लोकप्रतिनिधींनी पीक नुकसानीचे पंचनामे व अग्रीम भरपाईसाठी पाठपुरावा करावा-बाजीराव ढाकणे
पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत

माजलगाव तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे उमरी गावच्या नदीला महापूर आल्याने  गाव पुर्णतः पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढल्यामुळे येथील नदीला महापूर आला आहे . उमरी गावात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले असून गाव पाण्याखाली गेले आहे .या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे तर मोठे नुकसान झाले आहे.नदीला महापूर आल्याने गावात पाणी ,घरात  पाणीच पाणी झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले . त्यामुळे गोठयातील दोन म्हैशी पाण्यात वाहून गेल्या आहेत. बाजरीच्या पिकात पाणी घुसल्याने बाजरीचे पिक वाहून गेले आहे.या पुरामुळे गावकर्यांची परिस्थिती खूपच गंभीर बनली असून अक्षरशः शेतकरी आणि गावकरी  टाहो फोडताना दिसत आहेत.

त्यामुळे माजलगाव प्रशासनाने या गावच्या पूर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे . अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

COMMENTS