Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शॉर्ट सर्किटच्या आगीत तरुणाचा मृत्यू

पुणे ः घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनासाठी विद्युत रोषणाईने झगमगाट झाली. मात्र पुण्याच्या खेड तालुक्यातील एका घरात याच ल

तेरामैल अपघात; आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | LOKNews24
राष्ट्रीय महामार्गावरील गिट्टीच्या ढिगार्‍यामुळे अपघातात वाढ
बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोपे नाही.

पुणे ः घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनासाठी विद्युत रोषणाईने झगमगाट झाली. मात्र पुण्याच्या खेड तालुक्यातील एका घरात याच लायटींगने मोठी दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी घराला केलेल्या डेकोरेशनचा स्पोट होऊन एका तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेडमधील बुद्रुक येथील दत्तनगर येथे राहणार्‍या वैभव गरुड या 35 वर्षीय तरुणाचा आगीत होरपळून मृ्त्यू झाला आहे. खेड पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभवच्या पश्‍चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.

COMMENTS