Homeताज्या बातम्यादेश

आपने केली 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच 11 उमेदवारांच्य

पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद
पाताळगंगा नदीत पुरात वाहून आले हजारो गॅस सिलेंडर; सिलेंडर पकडण्यासाठी नागरिकांची नदीकाठी मोठी धावपळ.
चार हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला l Crime Show | Lo

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी दिली आहे. भाजपमधून आलेल्या तीन आणि काँग्रेसमधून आलेल्या तीन नेत्यांना आपने उमेदवारी जाहीर केली आहे.
आपने ब्रह्म सिंह तंवर, अनिल झा आणि बीबी त्यागी या भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. चौधरी जुबेर, वीर सिंह धिंगान आणि सुमेश शौकीन या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना आपने उमेदवारी दिली आहे. ब्रह्म सिंह तंवर हे भाजपचे आमदार होते, त्यांनी ऑक्टोबर महिन्यात आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तंवर महरौली आणि छतरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. ते तीन वेळा नगरसेवक देखील राहिले होते.

या उमेदवारांना आपने दिली संधी
छतरपूर-ब्रह्मा सिंह तंवर, किराडी-अनिल झा, विश्‍वासनगर-दीपक सिंघला, रोहतास नगर-सरिता सिंह, लक्ष्मी नगर-बी.बी. त्यागी, बदरपूर-राम सिंह नेताजी, सीलमपूर-जुबैर चौधरी, सीमापुरी-वीर सिंह धींगान, घोंडा-गौरव शर्मा, करावल नगर-मनोज त्यागी, मटियाला-सोमेश शौकीन यांच्या नावांचा समावेश आहे.

COMMENTS