Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाकिस्तान हादरलं! अफगाण सीमेजवळ पोलीस स्टेशनवर आत्मघाती हल्ला; १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा मृत्यू, ड्रोनचाही वापर?

शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमधून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अफगाण सीमेजवळील बन्नू जिल्ह्यात झालेल्या एका भीषण बॉम्बस्

होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र
होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धाचा वणवा; भारतीय जहाजावर भीषण हल्ला, एक खलाशी मृत्यू
थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येवर हल्ल्याचा प्लॅन

हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात.. -  Marathi News | Major bomb attack in Pakistan more than 15 police officers  killed | TV9 Marathi

शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमधून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अफगाण सीमेजवळील बन्नू जिल्ह्यात झालेल्या एका भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. या हल्ल्यात १५ हून अधिक पोलीस अधिकारी ठार झाले असून, हा हल्ला थेट पोलीस स्टेशनला टार्गेट करून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार थेट पोलीस स्टेशनच्या गेटवर आदळली. हा स्फोट इतका भीषण होता की, काही सेकंदातच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा १५ पेक्षा जास्त पोलीस अधिकारी ड्युटीवर होते, अशी माहिती पोलीस अधिकारी सज्जाद खान यांनी दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, स्फोटानंतर जेव्हा इतर कर्मचारी मदतीसाठी धावले, तेव्हा त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर केल्याचाही दावा केला जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील घरांचेही मोठे नुकसान झाले असून सर्वत्र हाहाकार माजला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील एका रुग्णालयावर हल्ला केला होता, ज्यामध्ये ४०० हून अधिक जणांचा बळी गेल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पोलीस दलावर झालेला हा सर्वात मोठा प्रत्याघात मानला जात आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थी करण्यात अपयशी ठरलेला पाकिस्तान आता अंतर्गत सुरक्षा आणि सीमावादाच्या भीषण पेचात अडकला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तान सरकारला मोठा धक्का बसला असून, मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS