Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई-वडिलांच्या रागाचा मनावर परिणाम; तरुणाने शेतात गळफास घेऊन जीवन संपवले

कडा : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे आई-वडील रागावल्याचा मनावर परिणाम होऊन 21 वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार
जागतिक एड्स दिनानिमित्त सातारा शहरात प्रबोधनपर रॅली

कडा : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे आई-वडील रागावल्याचा मनावर परिणाम होऊन 21 वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराज हा घरच्या कामात मदत करत नसल्यामुळे त्याचे आई-वडील त्याला समज देत रागावले होते. या घटनेचा राग मनात धरून विराजने मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील ‘काळशेत’ नावाच्या शिवारातील सर्व्हे नं. 119 मधील आपल्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. काही वेळाने शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवले व कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विराजच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

COMMENTS