Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समनक जनता पार्टीची माहूर  तालुका कार्यकारिणी घोषित !

तालुकाध्यक्ष पदाची धुरा प्रा. रवी राठोड यांच्यावर

माहूर प्रतिनिधी - समनक जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण कालापाड यांच्या यांच्या  प्रमुख  मार्गदर्शनात  दि. 05 जुलै र

तीन दहशतवाद्यांना पुलवामात कंठस्नान
माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रयत्नांना यश
मुंबईत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीने केली आत्महत्या

माहूर प्रतिनिधी – समनक जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण कालापाड यांच्या यांच्या  प्रमुख  मार्गदर्शनात  दि. 05 जुलै रोजी संपन्न झाली या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीची योजना आखण्यात आली व माहूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यामध्ये तालुकाध्यक्ष पदाची धुरा प्रा. रवी राठोड यांचेवर सोपविण्यात आली तर ता. उपाध्यक्ष नागेश कुमरे, सचिव- रमेश जाधव, अदिना  प्रदेशाध्यक्ष  प्रा. रामकृष्ण कालापाड  यांच्या हस्ते   प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल  राठोड,  जिल्हाध्यक्ष प्रा. निळू पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत  नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी माहूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी समनक जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण कालापाड, जिल्हाध्यक्ष प्रा. निळू पवार  डॉ. अनिल राठोड यांच्या हस्ते समनक जनता  पार्टीचा दुपट्टा गळ्यात घालून प्रवेश केला.  यावेळी प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण कालापाड, डॉ. अनिल राठोड जिल्हाध्यक्ष निळू पवार यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. सर्व बहुजनाची एकजूट करून  राजकीय सत्ता मिळविण्याचे एकमेव ध्येय ठेऊन आपली राजकीय वाटचाल करावी असे प्रतिपादन केले. यावेळी  प्रल्हाद राठोड, राजेंद्र महल्ले, चंचल मुनेश्वर, यादव आडे, कुणाल राठोड, अविनाश पाचकोरे, आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS