Homeताज्या बातम्यादेश

उमेश खून प्रकरणातील आरोपीचे एन्काउंटर

प्रयागराज ः  उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी एका आरोपीचे एन्काउंटर केले आहे. अरबाज असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी दुपारी धुमनगंज येथील

उपचारानंतर कॅन्सरग्रस्त रुग्णही चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले
भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत | LOKNews24
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन

प्रयागराज ः  उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी एका आरोपीचे एन्काउंटर केले आहे. अरबाज असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी दुपारी धुमनगंज येथील नेहरू पार्कजवळ ही चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अरबाज नेहरू पार्क परिसरात लपून बसला होता. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. ज्यात एक जवान जखमी झाला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. त्याच्या छातीत आणि पायाला गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी जखमी अरबाजला स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS