Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेगाव ग्रामपंचायत साजरा करणार 65 वा वर्धापन दिन

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या वर्धापन दिना निमित्त शुक्रवार दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध हवाम

शिर्डीत साईंच्या जयघोषात रंगांची उधळण
कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
फेसबुकवर अवैध धंद्याच्या लाईव्ह शूटींगने पोलिसांसमोर आव्हान

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या वर्धापन दिना निमित्त शुक्रवार दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, महंत स्वामी गोवर्धन गिरीजी महाराज, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वाल्मिकराव कोळपे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत वाबळे यांनी दिली असून वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने विविध शिबिरांचे, व्याख्याने, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 सुरेगाव ग्रामपंचायत हि तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत मानली जाते.त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी योजना राबवल्या आहेत. याच सुरेगाव ग्रामपंचायतीचा आगामी 24 फेब्रुवारी रोजी 65 वा वर्धापन दिन संपन्न होत आहे त्या साठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन सरपंच शशिकांत वाबळे उपसरपंच मच्छीन्द्र हाळनोर,ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर,सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

COMMENTS