Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती

सोलापूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. सोलापूरच्या दौर्‍यावर असताना शरद पवार यांनी

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल

सोलापूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. सोलापूरच्या दौर्‍यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत काल झालेल्या भेटीवर देखील भाष्य केले. कालच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांनी आज बोलताना पक्षातील सहकार्‍यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामध्ये परिवर्तन व्हावे यासाठी हितचिंतकांचे प्रयत्न सुरु असून ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै रोजी दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रि पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रस्ताव देण्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवार यांनी आज बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या राजकीय धोरणात भाजपसोबत युती शक्य नसल्याचे म्हटले. त्यासोबतच त्यांनी हितचिंतकांचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले. हितचिंतक आमच्या सहकार्‍यांच्या भूमिकेत परिवर्तन करता येईल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीसंदर्भात पुन्हा एकदा पत्रकारांनी विचारले असता शरद पवार यांनी आम्ही एकत्र असो किंवा होता पुढं एकत्र असू त्यावेळी देखील भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही असे म्हटले. मात्र, यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट पडले ते आगामी काळात एकत्र येऊ शकतात, असे संकेत शरद पवारांनी दिल्याच्या चर्चा सुरु आहेत.
राहुल गांधी यांचे निलंबन रद्द झाल्याचा संदर्भ देत पंतप्रधान पदावरुन इंडिया आघाडीत वाद होईल का? असा प्रश्‍न विचारला असता शरद पवारांनी असा वाद होणार नाही असे स्पष्ट केले. इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार असून 30 ते 40 नेते उपस्थित असतील, असं शरद पवार म्हणाले.

COMMENTS