Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग

माजी आमदारानंतर नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजपच्या वाटेवर

मुंबई : रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुनील तटकरे आणि रायगड हे अतुट समीकरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्र

दिंडोरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सवांद यात्रा संपन्न (Video)
अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार
अंडरवर्ल्डशी राष्ट्रवादी काँग्रेसचं काही नातं आहे का…? (Video)

मुंबई : रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुनील तटकरे आणि रायगड हे अतुट समीकरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसच्या या बालेकिल्ल्याला लवकरच भगदाड पडण्याची चिन्हे आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा या भाजपवासी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रायगड राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांच्या कन्या गीता पालरेचा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
मागच्या तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला होता. रायगडचे आमदार भरत गोगावले शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण असा सवाल विचारला जात होता. दरम्यान याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे हे आव्हान सुनील तटकरे परतवून लावतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात जवळचे आणि खासदार सुनील तटकरे यांचेही जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कन्या आता भाजपच्या वाटेवर असल्याने सुनील तटकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करता आलेली नाही. राष्ट्रवादी पक्षाकडून विकासकामांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशा काही कारणांमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा विचार करत असल्याचे गीता पालरेचा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर आता सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनीही भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अवधूत तटकरे यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे पुतणे आहेत. अवधूत यांनी बारा वर्षे रोह्याचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. 2014 ते 2019 या काळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये चुलत बहीण व राज्यमंत्री अदिती तटकरेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परिणामी, काही काळ अवधूत राजकारणापासून दूर राहिले आणि मध्यंतरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले होते.

COMMENTS