आरेत आणखी एक बिबट्या जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरेत आणखी एक बिबट्या जेरबंद

मुंबई प्रतिनिधी - आरे दुग्ध वसाहत येथे रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याला वनविभागाने पकडले. सकाळी सहा वाजता युनिट क्रमांक 15 येथून बिबट्याला पिंजर्‍या

तुम्ही अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, आम्ही बनवलं तर खंजीर खुपसला का?
कर्जतमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक
पहाटेच्या शपथविधीचे कवित्व  

मुंबई प्रतिनिधी – आरे दुग्ध वसाहत येथे रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याला वनविभागाने पकडले. सकाळी सहा वाजता युनिट क्रमांक 15 येथून बिबट्याला पिंजर्‍यात पकडण्यात आले असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. इतिका लोट हिच्या मृत्यूनंतर नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने युनिट क्रमांक 15 येथे 30 सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोन संशयित बिबट्याचे निरीक्षण सुरू केले. तसेच तेथे दोन पिंजरेही लावले. बुधवारी सकाळी तीन वर्षांचा सी-55 नर बिबट्या या पिंजर्‍यात अडकला. त्यानंतर वनविभागाने दुसर्‍या सी-56 बिबट्याचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी युनिट क्रमांक 15 येथे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली. हा बिबट्या सी-56 आहे का लवकरच समजेल.

COMMENTS