Homeताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराला भेट दिली. याव

महायुतीतील अस्वस्थता!
वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पंकजाताईंचे बीडमधील 42 कोटींच्या कथित कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणी मौन का?बोगस वृक्षलागवडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट



राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर  परिसरातील विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच त्यांनी भगवान कंकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन विधीवत पूजा-अर्चा केली आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौड, विश्वनाथ माणुसमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मंदिर परिसरात आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शासकीय अधिकार्‍यांसमवेत मंदिराच्या विकासकामांची पाहणी केली व कोनशिलेचे अनावरण केले. कंकालेश्वर मंदिराच्या विधीवत पूजेप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील 12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या कंकालेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाची दुरूस्ती व संवर्धल याचे काम पुरातत्व खात्याच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. या कामासाठी स्व. अजितदादा पवार यांनी 9 कोटी 14 लाखांहून अधिकचा पुरातत्व विभागीय निधी आणि जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 11 कोटी 21 लाखांहून अधिकचा निधी मंजूरी दिलेली आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ 12 एकर आहे. येथील अतिक्रमणे हटविण्यासह दुरूस्ती व इतर सुविधांचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

COMMENTS