Homeताज्या बातम्या

15 ऑगस्टपूर्वी पिक विमा द्या; अन्यथा झेंडावंदन रोखू-प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड : सन 2025-26 चा जाहीर केलेला पिक विमा शेतकर्‍यांच्या खात्यावर 15 ऑगस्टपूर्वी जमा करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो

थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !


बीड : सन 2025-26 चा जाहीर केलेला पिक विमा शेतकर्‍यांच्या खात्यावर 15 ऑगस्टपूर्वी जमा करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा काढून मंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही, असा इशारा किसान संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांना निवेदन देताना प्रा. मोराळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 17,500 रुपयांचा पिक विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. आसमानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने मदत करणे आवश्यक आहे. त्या म्हणाल्या की, शासनाच्या खरेदी केंद्रांचा अभाव असल्यामुळे शेतकर्‍यांना सोयाबीन अवघ्या 3,000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकावे लागले. याशिवाय काढणीसाठी एकरी सुमारे 6 हजार रुपये खर्च करावा लागला. शासनाने एक रुपयात पिक विमा योजना राबवली असली तरी त्यासाठीचा प्रीमियम हा शेतकर्‍यांकडून विविध करांच्या माध्यमातूनच भरला जात असल्याने सरकारने शेतकर्‍यांवर उपकार केलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये शेतीसाठी खरेदी होणार्‍या बियाणे, खते व औषधांवरील जीएसटी माफ करणे, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना किमान एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणे, शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी दिवसा 12 तास मोफत वीजपुरवठा करणे, कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करणे तसेच अपुर्‍या पावसामुळे दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिएकर 10 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा 15 दिवसांनंतर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी दिला. यावेळी दिलीप भिसे, प्रकाश भन्साळी, राजेंद्र आमटे, बाळासाहेब मोरे, राजू गायके, अशोक गीते, दिनकर रिंगणे, शहादेव हिंदोळे, भीमराव कुटे, सुहास जायभाये, राजेंद्र दराडे, देविदास चव्हाण, बबनराव आंधळे, तुकाराम बारगजे, रमेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS