अकोले : भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने या धरणातून 10209 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून ते पाणी जायकवाडीच्या दिशेने निघाले आहे. गत तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली होती. परिणामी विसर्गही कमी करण्यात आला होता. पण काल सकाळपासून पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाण्याचे लोंढे धरणांत विसावत होते.11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदराचा साठा 10402 दलघफू कायम ठेऊन सकाळी 5295 क्युसकेने पाणी सोडण्यात आले. तर निळवंडेतून प्रवरा नदीत 5295 क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी भंडारदरातून 4867 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. वाकीतून 556 क्युसेकने विसर्ग सुरू होता. निळवंडेतून विसर्ग वाढविण्यात येऊन तो 10209 क्युसेक करण्यात आला. आढळातही आवक सुरू झाली असून हे धरण तुडूंब झाल्याने 198 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

COMMENTS