Homeताज्या बातम्या

समाधान शिबिरातून महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गीआ. दाते ; भाळवणीत २६०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ

 भाळवणी : राज्य शासनाच्या वतीने पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाळवणी (ता. पारनेर) येथे

प्रशासनाने वर्षभर गतिमान सेवा द्यावीआ. काळे ; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारा’चा उद्देश साध्य करण्याचे आवाहन
राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे
बारामती पोटनिवडणुकीत आता पेच वाढला…

 भाळवणी : राज्य शासनाच्या वतीने पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाळवणी (ता. पारनेर) येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन महसूल विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. समाधान शिबिरातून महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लागलायचे समाधान आ. काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने हे शिबीर पार पडले. या शिबीरात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला. यात शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रातील नोंदणी शुल्क माफी, भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ झालेल्या जमिनींचे सुधारित ७/१२ उतारे वितरण, अकृषिक (एन.ए.)  परवानगी, जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत नोंदी तसेच वादग्रस्त व साध्या फेरफार प्रकरणे मार्गी लावण्यात आली.मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आदेशांचे वितरण, ‘हेल्पडेस्क’ च्या माध्यमातून ७/१२ वरील त्रुटी दुरुस्त करून सुधारीत उतारे देण्यात आले. महिलांना शेतकरी प्रमाणपत्रे, सर्वांसाठी घरे योजनेतील लाभार्थ्यांना पट्टे, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुमारे १७ विभागांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना सेवांचा लाभ देण्यात आला.या शिबीराच्या अध्यक्षस्थानी आ. काशिनाथ दाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, प्रशांत गायकवाड, राहुल शिंदे, विक्रम कळमकर, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर,  तहसिलदार गायत्री सौंदाणे, मिलिंद कुलथे, शेतकरी महिला बचतगट, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.राज्य शासनाने प्रत्येक मतदासंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून उपविभागीय अधिकारी नगर- पारनेर तहसिल विभागांनी या शिबीराचे आयोजन केले असून यामध्ये २६०० पेक्षा जास्त लाभार्थी पारनेर तालुक्यातील तर २७०० पेक्षा जास्त लाभार्थी नगर तालुक्यातील असून या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. – आ. काशिनाथ दाते. 

COMMENTS