बीड : पाच लाख रुपयांचा धनादेश वटला नसल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात बीड येथील मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी दुर्गादास

बीड : पाच लाख रुपयांचा धनादेश वटला नसल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात बीड येथील मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी दुर्गादास गुंजाळ यांची निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी शेख मुबीन शेख आगा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीचे डी.एड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला शिक्षकाची नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आरोपीने एकूण सात लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले असून, उर्वरित दोन लाख रुपये नोकरी लागल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र सहा महिने उलटूनही नोकरी न लागल्याने फिर्यादीने दिलेल्या रकमेची परतफेड मागितली. त्यानंतर आरोपीने 10 जुलै 2025 रोजी भारतीय स्टेट बँक, बीड शाखेचा पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश फिर्यादीने बँकेत जमा केला असता 14 जुलै 2025 रोजी झरूाशपीं डीेिंशिव लू ऊीरुशी या शेरासह तो न वटता परत आला. यानंतर फिर्यादीने वकिलामार्फत आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशावरील रकमेची मागणी केली. नोटीस प्राप्त होऊनही आरोपीने मुदतीत रक्कम अदा केली नाही किंवा नोटीसला उत्तरही दिले नाही. त्यामुळे फिर्यादीने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, बीड यांच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम 138 अंतर्गत एस.एस.सी. क्र. 1743/2025 असा दावा दाखल केला. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादीसह साक्षीदार शेख आरेफ व शेख वजीर यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच मूळ धनादेश, बँकेचा परतावा मेमो, कायदेशीर नोटीस, पोस्टाची पावती व अन्य कागदपत्रे पुराव्यादाखल न्यायालयात सादर करण्यात आली. दरम्यान, आरोपीच्या वतीने फिर्यादी व साक्षीदारांचा सखोल उलटतपास करण्यात आला. तसेच फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यातील त्रुटी आणि कायदेशीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, फिर्यादीने दिलेली रक्कम ही कायदेशीरदृष्ट्या वसूल करता येण्याजोगे देणे (ङशसरश्रश्रू एपषेीलशरलश्रश ऊशलीं) नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, बीड यांनी आरोपी दुर्गादास गुंजाळ यांची संबंधित प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. बाळासाहेब के. गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सागर नाईकवाडे, अॅड. श्याम शिंदे, अॅड. गणेश शिंदे, अॅड. लहू बागलाने आणि अॅड. त्रिंबक जाधव यांनी सहकार्य केले.

COMMENTS