Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्र एकीकरण समितीला संधी द्या

राज ठाकरे यांचे सीमा भागातील नागरिकांना आवाहन

बेळगाव ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या असल्या तरी, यादिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपकडून प्रचार

मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य नको ः राज ठाकरे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात एकत्र

बेळगाव ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या असल्या तरी, यादिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपकडून प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फळी कर्नाटकात उतरली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो, केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच संधी द्या.
राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना उद्देशून ट्विट केले आहे की, मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणार्‍या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. निवडून आल्यावर मराठी उमेदवारांनी मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवरील अन्याय याविरोधात विधानसभेत वाचा फोडायला हवी. गेल्या काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील 40 गावांच्या मुद्यांवरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न पुन्हा पेटला होता. दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. मात्र अजूनही हा तिढा सुटलेला नाही. मराठी भाषिक आणि कन्नडिगांमधील वाद कायम आहे. त्यातच कर्नाटकात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणार्‍या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे

COMMENTS