Homeताज्या बातम्या

संगमवाडीचे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी!

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील संगमवाडी (ता. कंधार) येथील भूमिपुत्र तथा प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापी

एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी; नागरिकांची त्रस्त अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे आवाहन
ईशा सिंगचे सुवर्ण, मनू भाकरने पटकावले कांस्य; हांगझू नेमबाजी विश्वचषकात भारताची दमदार कामगिरी
गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधनासाठी स्वतंत्र अध्यासन, काय आहे प्रकल्प,  कोणाला होता येणार सहभागी?

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील संगमवाडी (ता. कंधार) येथील भूमिपुत्र तथा प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापूर्वी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ व नियमावली, २०१४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीच्या सदस्यपदीही त्यांची निवड झाली होती.

डॉ. गीते हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील अतिविशेषोपचार केंद्रातील (एसएसबी) युरॉलॉजी विभागाचे प्रमुख असून, नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सन १९७४ मध्ये मन्याड नदीकाठी वसलेल्या संगमवाडी येथे त्यांचा जन्म झाला. वडील दिवंगत अर्जुनराव देवराव गीते आणि आई शाहूबाई अर्जुनराव गीते यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांना डॉक्टर बनविले.

अधिष्ठाता, विभागप्रमुख, संचालक आणि प्राध्यापक अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. डॉ. गीते यांचे ५३ संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, युरॉलॉजी विषयावरील विविध पुस्तकांमध्ये त्यांच्या सहा प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. ते इंडियन जर्नल ऑफ युरॉलॉजीचे बोर्ड मेंबर असून, पश्चिम विभागीय युरॉलॉजी असोसिएशनचे माजी सदस्य आहेत.

तसेच, जे. जे. रुग्णालयात मेंदूमृत रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. डॉ. व्यंकट गीते यांच्या कुलगुरूपदी झालेल्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल कंधार तालुक्यासह नांदेड जिल्हा आणि राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS