कोपरगाव: संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांची संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नांमुळे तै

कोपरगाव: संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांची संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नांमुळे तैवान, जर्मनी आणि जपानमधील नामांकित विद्यापीठांमध्ये तीन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. तर एका विद्यार्थिनीची जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेथील विद्यापीठांच्या वतीने भरघोस शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
यापूर्वी संजीवनीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना तैवान, कॅनडा, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम इत्यादी देशांमधील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. आता संजीवनीच्या सई प्रकाश रासकर हिची तैवानमधील ‘आय-शौ युनिव्हर्सिटी’मध्ये, ईश्वरी भाऊसाहेब अनुसे आणि कल्याणी जयवंत घोगळ यांची तैवानमधील ‘चांग गुंग युनिव्हर्सिटी’मध्ये निवड झाली आहे. तसेच रोहित जयवंत घोगळ याची जर्मनीतील ‘बर्लिन स्कूल ऑफ बिझनेस अँड इनोव्हेशन’ येथे, गायत्री भाऊसाहेब शिंदे हिची तैवानमधील ‘प्रॉव्हिडन्स युनिव्हर्सिटी’मध्ये, तर प्रथम चंद्रशेखर गाडे याची जपानमधील ‘टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स’च्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये निवड झाली आहे. याशिवाय धनश्री प्रणील चौधरी हिची एमएस (MS) साठी जर्मनीतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड’ येथे निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते इंटर्नशिप व उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS