Homeताज्या बातम्या

‘वाचता वाचता’ गुरुपौर्णिमा साजरी करण्यात ज्ञानाचा गौरव : प्राचार्य शंकरराव अनाप

श्रीरामपूर: ज्यांच्याकडून काही जीवन आदर्श शिकायला मिळतात, ते सर्व गुरूच असतात. डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित 'वाचता वाचता' पुस्तक वाचताना गुरुपौर्णिम

मराठवाड्यात भाजप शून्यावर; राज्यसभेच्या आधारावर किती दिवस राजकारण?
एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट; अकोलेत शिबिरे आयोजित करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
पदाधिकाऱ्यांच्या फौज कागदावरच? भाजपच्या आंदोलनात रिकामे पडले मैदान; संघटनात्मक ताकदीवरच प्रश्नचिन्ह

श्रीरामपूर: ज्यांच्याकडून काही जीवन आदर्श शिकायला मिळतात, ते सर्व गुरूच असतात. डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘वाचता वाचता’ पुस्तक वाचताना गुरुपौर्णिमा ही ज्ञानाच्या वातावरणात साजरी झाली, हा आनंद फार मोठा असून हा ज्ञानाचाच गौरव आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव अनाप यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, स्वाध्याय परिवार व अनाप विद्यार्थी मंचतर्फे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव अनाप यांचा थत्ते ग्राउंड परिसरातील सुयश दालनात विशेष सन्मान करण्यात आला; त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत ‘वाचता वाचता’ या पुस्तकाचा परिचय करून दिला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. इ. शेळके, स्वाध्याय परिवाराचे माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रभान मारुती कदम, जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. विजयाताई कदम, प्रा. शिवाजीराव बारगळ आदींनी गुरुवर्य प्राचार्य शंकरराव अनाप यांचा सन्मान केला. त्यांच्या ८९ व्या वर्षातील जीवनवाटचालीत त्यांनी जे ज्ञान-संस्कार दिले, त्या आठवणी उपस्थितांनी सांगितल्या.

प्राचार्य अनाप पुढे म्हणाले, ‘वाचता वाचता’ या पुस्तकातून अतिशय संस्कारशील लेखक, कवी व त्यांच्या ग्रंथांचा परिचय समोर आला आहे. डॉ. उपाध्ये यांनी सकसपणे हा परिचय करून दिल्यामुळे हे पुस्तक गुरुस्थानी असल्याचे सांगत डॉ. उपाध्ये यांनी अनेकांना लिहिते केले आणि दुर्लक्षित समाजाला ग्रंथसंस्कृतीची दिशा दिली असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी विविध प्रसंगांत गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आले. स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नागपूरहून आलेल्या प्रा. सोनाली बनसोडे यांचा प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी सत्कार केला; तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संस्कार केंद्रातील नियमितपणे फलकलेखन करणारी विद्यार्थिनी कु. समृद्धी झुराळे हिचा निर्मीक उपाध्ये व विद्यार्थ्यांसह तिच्या वर्गात पुस्तके देऊन सत्कार केला.

सौ. कमलताई अनाप यांनी सांगितले की, “आमचे सर ८९ व्या वर्षात वाटचाल करत असल्यामुळे ते धावपळ करू शकत नाहीत, पण माणुसकी आणि गुरूंचे प्रेम यामुळे त्यांचा असा सत्कार केला जातो, हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे.” असे सांगून त्यांनी उपक्रमाचे नियोजन केले व उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS