Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेचे कामे करणे हेच माझे कर्तव्य-एल.आर.वाजे

नायगाव प्रतिनिधी - नायगाव पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या 89 गावातील शेतकर्‍यांचे प्रलंबित असलेले महत्वाचे प्रश्न आणि शेतकर्‍यांना मिळणार्‍या शासना

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे
चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका

नायगाव प्रतिनिधी – नायगाव पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या 89 गावातील शेतकर्‍यांचे प्रलंबित असलेले महत्वाचे प्रश्न आणि शेतकर्‍यांना मिळणार्‍या शासनाच्या विहिरीचे बिले काढण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करून त्यांच्या बँक खात्यात गेले पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. हे उद्गार आहेत नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांचे.
पंचायत समितीच्या माध्यमातून कोणत्या शासकीय अधिकार्‍यासह कर्मचार्‍यां कडून कसल्याच प्रकारची आडवणूक होणार नाही यांची मी एक जबाबदारी गटविकास अधिकारी म्हणून माझे कर्तव्य असल्याचे गटविकास अधिकार्‍यानी सांगितले आहे. नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात सध्याच्या परिस्थितीत शासनाने घरकुले मिळाले असले, तरी घरकुल पूर्ण झाले नाही .ते पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः भेटी देऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून त्याचे बिले सुद्धा वेळेवर मिळावे म्हणून काळजी घेतली जाणार असल्याची ग्वाही  नायगाव पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी एल .आर. वाजे यांनी नागरिकांना दिली आहे. ग्रामीण भागातील खेड्या खेड्यात सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा चालू असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे त्यावर ही मात करण्यासाठी पंचायत समिती नायगाव प्रयत्न करणार असून या संदर्भात पाणी टंचाईचा आराखडा सुद्धा प्रशासनाकडे पाठवून देण्यात आला आहे ते ही लवकर नागरिकांना मुबलक पाणी मिळवून देण्याचे काम पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी एल. आर. वाजे यांनी सांगितले आहे.

COMMENTS