Homeताज्या बातम्या

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील सर्व जुन्या वाहनांवर एचएसआरपी (HSRP) क्रमांकफलक (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बसवण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित

‘भिक मागो’ आंदोलनातून जमा झालेले पैसे मुख्याधिकाऱ्यांकडे; रस्त्यांची दुरुस्ती व मूलभूत सुविधांची आंदोलकांची मागणी
व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या
महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्ता राखा !
HSRP नंबर प्लेट : ३१ डिसेंबर हीच अंतिम मुदत - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक -

मुंबई: राज्यातील सर्व जुन्या वाहनांवर एचएसआरपी (HSRP) क्रमांकफलक (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बसवण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत सामान्य नागरिक, मंत्री, आमदार, खासदार किंवा इतर लोकप्रतिनिधी असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे स्पष्ट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व वाहनधारकांना मुदतीपूर्वी एचएसआरपी बसवण्याचे आवाहन केले आहे.

परिवहन विभाग आणि पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, अनेक गुन्ह्यांमध्ये बनावट अथवा सहज बदलता येणाऱ्या क्रमांकफलकांचा वापर केला जातो. त्यामुळे गुन्हेगारांचा मागोवा घेताना तपास यंत्रणांना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनावर सुरक्षित आणि छेडछाड न करता येणारी एचएसआरपी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे वाहनांची ओळख पटवणे आणि तपास प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

नवीन वाहनांवर विक्रीच्या वेळीच एचएसआरपी बसवून दिली जाते. मात्र, जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर, म्हणजेच जवळपास ५५ ते ५६ टक्के वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. उर्वरित ४४ ते ४५ टक्के वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एचएसआरपीच्या नियमातून कोणालाही सूट मिळणार नाही. मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी किंवा इतर लोकप्रतिनिधी असोत, सर्वांनाच हा नियम लागू राहील. मुदत संपल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनावर कायद्यानुसार समान कारवाई केली जाईल.

यापूर्वी तीनदा मिळाली मुदतवाढ

वाहनधारकांना सुविधा मिळावी म्हणून शासनाने यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३० एप्रिल २०२५, १५ ऑगस्ट २०२५ आणि ३० नोव्हेंबर २०२५ अशी तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून, वाहनधारकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS