राणा दग्गुबाटी यांचा हाती मेरे साथी’ शुक्रवार रोजी प्रदर्शित होणार

Homeताज्या बातम्यादेश

राणा दग्गुबाटी यांचा हाती मेरे साथी’ शुक्रवार रोजी प्रदर्शित होणार

जागतिक कोरोना संकटात बदललेल्या परिस्थिती बाहुबली अभिनेते राणा दग्गुबाटी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित, बहुभाषी चित्रपट' हाती मेरे साथी' शुक्रवार 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ जीवनात हवीत ः कल्पनाताई वाघुंडे
नाशिक मधील विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष औद्योगिक प्रशिक्षण मिळणार 
बार्शी टाकळीत हभप अनिरूद्ध गोपाळकृष्ण क्षीरसागर महाराजांचे कीर्तन

हैदराबाद :  जागतिक कोरोना संकटात बदललेल्या परिस्थिती बाहुबली अभिनेते राणा दग्गुबाटी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित, बहुभाषी चित्रपट’ हाती मेरे साथी’ शुक्रवार 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हत्ती तसेच वन्यजीव सृष्टीचे रक्षण एका माणूस कशा प्रकारे करतो यावर चित्रपटात भाष्य केले आहे. वन-वन्यजीव संवर्धन ही चित्रपटाची संकल्पना आहे. 

प्रभू सोलोमन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आले. चित्रपटाची निर्मिती इरोज नाउ या संस्थाने केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. तेलुगूत चित्रपटास ‘ अरण्य ‘ तर तमिळ मध्ये ‘ कादन ‘ असे नाव देण्यात आले आहे. स्वतः राणा दग्गुबाटी यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःचा आवाज दिला आहे. चित्रपटात श्रीया पिळगावकर यांनी देखिल काम केले आहेत. राणा दग्गुबाटी ‘ हाती मेरे साथी’ चित्रपटा द्वारे वेगळ्यचा रूपात समोर आले आहे. चित्रपटाच्या विविध चित्रफितींना सामाजिक माध्यमांवर अनेक अभिनेते, कलाकार, चित्रपट समीक्षक आणि सामान्य रसिकांमधून जोरदार प्रतिसाद मिळाला. चित्रपटासाठी राणा दग्गुबाटी यांनी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रण केले आहे. हाती मेरे साथी मागील वर्षी 2 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार होता मात्र जागतिक कोरोना संकट आणे देशव्यापी संचारबंदी मुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. 15 ऑक्टोबर 2020 पासून देशात पुन्हा एकदा चित्रपटगृह नियंत्रित स्वरूपात कोरोना नियमांसह सुरु झाले आहेत.

COMMENTS