Homeताज्या बातम्या

केंद्र गृहमंत्री आणि शिक्षणमंत्रीही विचित्रच; अभिजित दीपके यांची टीका! दगडफेकीचे प्लॅनिंग पोलिसांचेच असल्याचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, भारतीय

सोलापूरमधील ‘सद्गुरू बसवारूढ महास्वामींचा मठ’ उडवून देण्याची धमकी; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
भाजीपाल्याच्या नावाखाली ‘पुष्पास्टाईल’ खैराची तस्करी; वसईत ७-८ किलोमीटर पाठलाग करून टेम्पो जप्त
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा  दावा - Marathi News | Abhijit dipke in police custody big claim by  cockroach janata party | TV9 Marathi

छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष आणि पोलीस प्रशासनावर विविध गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नव्या शिक्षणमंत्र्यांसह योगगुरू रामदेव बाबा यांच्यावरही त्यांनी घणाघाती टीका केली.

दीपके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची छायाचित्रे हातात घेऊन लोकशाहीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणे, घोषणाबाजी करणे किंवा आंदोलन करणे याला संस्कृतीचा अपमान म्हणणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी रामदेव बाबा यांनी आंदोलनकर्त्यांवर भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या उद्योगसमूहाच्या उत्पादनांकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावला.

ते पुढे म्हणाले की, देशातील तरुण पिढी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांवरही आवश्यक तेव्हा विद्यार्थी आंदोलनकर्ते ठामपणे उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यार्थी आंदोलनाला परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. जर असे आरोप खरे असतील, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेचे ते मोठे अपयश ठरेल आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक आणि हिंसाचाराबाबत दीपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनापूर्वी काही संशयास्पद हालचाली झाल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावापेक्षा संविधानानुसार काम करावे, असेही ते म्हणाले.

COMMENTS