Homeताज्या बातम्या

लग्नाचा तगादा ठरला जीवघेणा; वयाने १० वर्षे लहान असलेल्या प्रियकराने केली ४५ वर्षीय महिलेची हत्या, किनवटमधील धक्कादायक घटना

नांदेड: प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमाला वयाची कोणतीही अट नसते असे म्हटले जाते, मात्र कधी कधी याच अनैतिक प्रेमाचे परिणाम अत्यंत भयानक होतात. अशीच

आषाढी वारीत ७.४७ लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम यशस्वी
ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला थांबवा! 
उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ? केंद्रप्रमुख पदोन्नती प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी
Nanded Crime: वयाने दहा वर्ष छोट्या युवकासोबत 45 वर्षीय अविवाहितेचं प्रेम  जडलं; काही वर्षानंतर खटके उडाले अन् प्रियकराने प्रेयसीलाच संपवलं | Nanded  Crime news 45 year old unmarried woman life ended by boyfriend in Minor  dispute

नांदेड: प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमाला वयाची कोणतीही अट नसते असे म्हटले जाते, मात्र कधी कधी याच अनैतिक प्रेमाचे परिणाम अत्यंत भयानक होतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडली आहे. वयाने १० वर्षे लहान असलेल्या प्रियकरानेच एका ४५ वर्षीय अविवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगल धुमाळे (वय ४५) असे मयत महिलेचे नाव असून या घटनेने संपूर्ण किनवट तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत मंगल कोंडीबा धुमाळे ह्या अविवाहित असून त्या किनवट तालुक्यातील पाटोदा येथे घरात एकट्याच राहत होत्या. गावातीलच कृष्णा जाधव (वय ३५) या युवकासोबत त्यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. कृष्णा हा नेहमी मंगल यांच्या घरी येत-जात असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून “माझ्याशी लग्न कर” असा तगादा कृष्णा मंगल यांच्याकडे लावत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडून वाद होत होते.

शनिवारी रात्री आरोपी कृष्णा हा मंगल यांच्या घरी गेला असता पुन्हा त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या कृष्णाने मंगल यांचा गळा आवळून त्यांचा जागीच खून केला आणि घटनास्थळावरून पोबारा केला. दुसऱ्या दिवशी मयत महिलेची आई घरी गेली असता मुलगी निपचित अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच किनवट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तपासादरम्यान घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. तसेच घटनेनंतर आरोपी घरातून पळून जाताना मयत महिलेच्या बहिणीने पाहिले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी “कृष्णाने मंगलला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मारहाण केली आणि तिचा खून केला”, अशी अधिकृत तक्रार मयत महिलेचा भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात कृष्णा जाधव याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS