Homeताज्या बातम्या

रेशीम उद्योगाची स्वप्ने कागदावरच तुटली24 तास विजेअभावी प्रधानसांगवीतील रेशीम शेती कोमेजली

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अ

किनवट-गोकुंद्यात दारूचा महापूर; राज्य उत्पादन शुल्क विभाग सुस्त, तर तरुण पिढी उद्ध्वस्त!‘असून अडचण आणि नसून खोळंबा’; कार्यालयाला कायम टाळे, कारवाई शून्य
बोगसगिरीला चाप! व्यापार्‍यांचे धाबे दणाणले; ज्वारी-मका खरेदीत ’केराम पॅटर्न’चा दणका
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण



शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अस्तित्वाचा संघर्ष करत आहे. रेशीम उद्योग संचालनालय, नागपूर आणि किनवट कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच बोधडी खुर्द येथे शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडले. शेतकर्‍यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खरा; मात्र प्रत्यक्षात शून्यातून उभा राहिलेला रेशीम उद्योग आज दुरवस्थेच्या गर्तेत सापडला असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
पाच वर्षांपूर्वी कृषी आणि रेशीम विभागाच्या मोठ्या गाजावाजात प्रधानसांगवीसह परिसरातील गावांमध्ये तुती लागवडीची हिरवी स्वप्ने पेरली गेली. परंतु, कालंतराने हा उद्योग केवळ कागदोपत्री उपक्रमांपुरताच उरला आहे. प्रधानसांगवी येथील रेशीम उत्पादक शेतकरी पांडुरंग गंगाराम केंद्रे यांनी बोलताना या उद्योगातील वास्तव व्यथा मांडली.रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी आणि तुतीची बाग फुलवण्यासाठी अखंड पाण्याची अन् चोवीस तास विजेची अत्यंत गरज असते. उन्हाळ्यात आळ्यांच्या शेडमध्ये अनुकूल थंड हवामान राखणे आणि कीटकांना जिवंत ठेवणे विजेच्या लपंडावामुळे अशक्य होते, असे केंद्रे यांनी सांगितले. एकेकाळी एक ते दीड क्विंटलचा रेशीम कोषांचा तोडा निघायचा. बाजारातील दरांचे चढ-उतार सोसूनही शेतकर्‍यांनी या उद्योगाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु:  तुतीच्या बागा जगवण्यासाठी मुबलक पाणी आणि 24 तास वीज आवश्यक असते. उन्हाळ्यात शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विजेवर चालणारी यंत्रणा अपरिहार्य ठरते. कृषी व रेशीम विभागाने या तांत्रिक अडचणींवर शाश्वत तोडगा अथवा हमी देणे गरजेचे होते. वेळेवर संसाधने न मिळाल्याने आज प्रधानसांगवीसह अनेक गावांमधील रेशीम प्रकल्प बंद पडले आहेत. कृषी विभाग आणि रेशीम संचालनालयाने केवळ प्रशिक्षणाचा देखावा न करता, शेतकर्‍यांना अखंड वीज आणि योग्य बाजारपेठेची भक्कम साथ दिली, तरच हा उद्योग पुन्हा एकदा कात टाकू शकेल, असा सूर शेतकरी वर्गातून उमटत आहे.

COMMENTS