Homeताज्या बातम्या

पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त चिखलबीड येथे पशुधन आरोग्य शिबिरशेकडो जनावरांवर उपचार, चारा बियाणांचे वाटप

महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता सामाजिक

वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पंकजाताईंचे बीडमधील 42 कोटींच्या कथित कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणी मौन का?बोगस वृक्षलागवडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
सकल मातंग समाजाची आक्रमक मागणीअनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन
गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त ढाकणवाडीत वृक्षारोपण
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपणांस ...



महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वडवणी तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांच्या पुढाकारातून चिखलबीड येथे सोमवार, दि. 27 जुलै 2026 रोजी भव्य पशुधन आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकरी व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांसह सहभाग नोंदवला. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून जनावरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारांचे निदान, पशुशस्त्रक्रिया, लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच संसर्गजन्य आजारांवर उपचार करण्यात आले. पशुपालकांना आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जनावरांच्या संगोपनासाठी चारा बियाणांचेही मोफत वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी पशुधन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असल्याने अशा आरोग्य शिबिरांमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळतो. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या प्रसंगी माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, भाजपा नेते महादेव तात्या निर्मळ, भाजपा जिल्हा सचिव मच्छिंद्र बप्पा झाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुई पिंपळा येथे 5 हजार वृक्षांची लागवड; ग्रामसुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा
दरम्यान, पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुई (पिंपळा) येथे पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाचा संदेश देत विविध उपक्रम राबविण्यात आले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांच्या माध्यमातून घनवन पद्धतीने तब्बल 5 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच गावातील सुरक्षितता वाढविण्यासाठी प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन दि. 26 जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  आदर्श सरपंच मयूर आंधळे व त्यांच्या सहकार्‍यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे रुई (पिंपळा) गावाने ‘हरित, सुरक्षित आणि आदर्श गाव’ या दिशेने वाटचाल सुरू केल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले पशुधन आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व ग्रामसुरक्षा उपक्रम हे समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे ठरले आहेत.

COMMENTS