बीड: शहरातील नवीन भाजी मंडईत मधुमक्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मि

बीड: शहरातील नवीन भाजी मंडईत मधुमक्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साधारण महिनाभरापूर्वी बाजारात मधुमक्याची आवक सुरू झाली होती. त्या काळात मधुमक्याची कणसे ४० ते ५० रुपये किलो दराने विकली जात होती. मात्र, आता आवक वाढल्यामुळे हे दर कमी होऊन ३० ते ४० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. दर नियंत्रणात आल्यामुळे बाजारात मधुमक्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे.
याबाबत मधुमक्याचे ठोक व किरकोळ विक्रेते शेख रिझवान बागवान यांनी माहिती देताना सांगितले की, बाजारात आवक वाढल्याने भाव नियंत्रणात आले आहेत आणि ग्राहकांचाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हातगाड्यांवर सोलून ठेवलेली लसलशीत, पिवळ्या जर्द रंगाची मधुमक्याची कणसे भाजी मंडईत येणाऱ्या प्रत्येक ग्राहkaचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसाळी वातावरणात ताज्या मधुमक्याला मागणी वाढली असून नागरिकांकडून खरेदीला विशेष पसंती दिली जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी दिली.

COMMENTS