Homeताज्या बातम्या

के. रामलू शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेत २५ विद्यार्थी पात्र; कुंडलवाडी परिसरातून कौतुकाचा वर्षाव

कुंडलवाडी: येथील के. रामलू पब्लिक स्कूलने यंदाच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम

देवशयनी आषाढी एकादशी: किनवट परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमला; मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी
शिक्षकाच्या आक्रोशाकडे पाठ फिरवणारा शिक्षण विभाग? सुनील मोरे यांच्या आत्महत्येने शिक्षण विभागात खळबळ
बोकारे कुटुंबाचे विविध मान्यवरांकडून सांत्वन; २८ जुलै रोजी श्रद्धांजली सभा

कुंडलवाडी: येथील के. रामलू पब्लिक स्कूलने यंदाच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेच्या इयत्ता चौथीतील ७ व इयत्ता सातवीतील १८ अशा एकूण २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, कुंडलवाडी शहरासह परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष साईरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, प्राचार्य एस. जाधव, उपप्राचार्या एम. सपना यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS