Homeताज्या बातम्या

रॅलीऐवजी आज जिल्हाधिकार्‍यांमार्फत शिक्षणासंदर्भातील निवेदन; बीडमध्ये निर्धार सभेचे आयोजन

बीड: दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सोमवार (दि. २७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आलेली ’जनक्र

बेलापूर ग्रामपंचायत आयोजित शिबिरास तहसीलदारांची भेट; अडीच हजार मतदारांनी घेतला लाभ
व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या
कोपरगाव येथे पाच दिवसीय योग उत्सव उत्साहात; नियमित योगाभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांन आवाहन

बीड: दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सोमवार (दि. २७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आलेली ’जनक्रांती विद्यार्थी-विद्यार्थिनी-पालक रॅली’ स्थगित करण्यात आली आहे. त्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्धार सभा घेऊन शिक्षणासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी दिली.

या निवेदनात दर्जेदार शिक्षण, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, वेळेत निकाल जाहीर करणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० रद्द करणे, एनटीए (NTA) बरखास्त करणे, एनटीएचे अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार जोशी यांच्याकडून पेपरफुटी व निकालातील कथित घोटाळ्यांचा तपास काढून घेणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पेपरफुटी व निकालातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांवर कथित अत्याचार करणार्‍या संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह इतरांवर गुन्हे दाखल करावेत आणि जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रॅलीऐवजी निदर्शने करून शिक्षण क्षेत्रातील मूलभूत प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा समस्यांवरील अंतिम उपाय नसून शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

या बैठकीस कॉ. नामदेव चव्हाण, प्रा. सुशिला मोराळे, शेख शफीक, परवेझ कुरेशी, बाजीराव ढाकणे, अशोक येडे, राजेंद्र आमटे, कॉ. सुहास जायभाये, नितीन जायभाये, अमजद कुरेशी, किशोर कुलकर्णी, शेख पाशाभाई, कॉ. अभिषेक शिंदे, इलियास बागवान, अविनाश डरफे, नारायण शिंदे, साजेद कुरेशी आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी केले.

COMMENTS