Homeताज्या बातम्या

आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिक संतप्त, लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप

बीड: बीड शहरातील प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असू

संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन
शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

बीड: बीड शहरातील प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रभागातून अनेक वर्षांपासून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना मोठी आघाडी मिळत आली आहे, त्याच परिसरातील नागरिक आज चिखलातून चालण्यास मजबूर झाले आहेत. विकासकामांच्या बाबतीत या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी येणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर या भागातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

आरिश मस्जिद परिसरात तातडीने सिमेंट काँक्रीट (CC) रस्ता मंजूर करून काम तात्काळ सुरू करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS