Homeताज्या बातम्या

विठुरायाच्या गजराने माहूर नगरी भक्तिमय; आषाढी एकादशीनिमित्त भव्य शोभायात्रेत हजारो भाविकांचा सहभाग

माहूर: आषाढी एकादशीनिमित्त माहूर नगरीत शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शहरातील ऐतिहासिक व पुरातन वि

मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार
‘राजयोगी’ दिंडीचे ११ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान
महिला सक्षमीकरणात महाराजांचे कार्य कौतुकास्पद-तृप्ती देसाई
Comment ❤️ for Prompt , स्वतःला पंढरीच्या वारीत अनुभवा! ✨🚩, Create your  own divine Ashadhi Ekadashi AI video with Lord Vitthal in just a few  clicks!, 💬 Comment ❤️ below and I’ll send you the exact ...

माहूर: आषाढी एकादशीनिमित्त माहूर नगरीत शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शहरातील ऐतिहासिक व पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वेदमंत्रांच्या मंगलमय जयघोषात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, महाअभिषेक, महानैवेद्य व महाआरती पार पडली. त्यानंतर शहरातील विविध प्रभागांतून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण माहूर नगरी दुमदुमून गेली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात श्री रेणुका देवीचे पुजारी तथा प्रतिष्ठित नागरिक विकास जोशी यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा महाअभिषेक, महानैवेद्य, महाआरती व विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, अरविंद देव, अनिल कान्नव बेलखोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पूजनानंतर शहरातील विविध प्रभागांतून विठुरायाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. टाळ, मृदंग, हरिनामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पांडुरंग हरी’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. प्रभाग क्रमांक १२ मधील महिला मंडळाच्या वतीने सुवासिनी महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन धारण करून शोभायात्रेत सहभाग घेतला. तसेच भगवान विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आकर्षक झाक्यांनी उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

मार्गातील विविध ठिकाणी शोभायात्रेचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले तसेच पूजनही करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेदपाठशाळेचे वे. शा. सं. निलेश केदार यांनी केले.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक गोपू महामुने, शारदासुत खामणकर, सुरेश आराध्ये, ज्ञानेश्वर गुज्जलवाड, मिलिंद जोशी, संतोष जोशी, कान्नव, परेश देशपांडे, मंगेश इंगोले, मंजिरी कान्नव, शुभांगी आमले, सीमा जोशी, चित्राताई देशपांडे, जयश्री कान्नव, वृषाली देशपांडे, सुरेखा तळणकर आणि शीतल केदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या भक्तिमय शोभायात्रेत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.

COMMENTS