Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण व जीवे मारण्याची धमकी; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बीड: नवगण राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय काळे यांना गावातील एका व्यक्तीकडून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली

पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
शहापूर शिवारात विवाहित महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह 
शिरपूर तालुक्यात संताप! ग्रामदेवतेच्या रथाला लावली आग; सार्वजनिक मालमत्तेचीही तोडफोड!

बीड: नवगण राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय काळे यांना गावातील एका व्यक्तीकडून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दुकानदार विजय काळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवगण राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात विजय काळे हे नेहमीप्रमाणे मशीनद्वारे धान्य वाटपाचे काम करत होते. यावेळी गावातील भीमा लक्ष्मण टुले हे दुकानात आले. संबंधित व्यक्तीकडे एपीएल शेतकरी योजनेचे रेशन कार्ड असून या योजनेअंतर्गत धान्याचा लाभ मिळत नसल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी भीमा टुले यांनी विजय काळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय दुकानातील मशीन व इतर साहित्य बाहेर फेकून दिल्याने साहित्याचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर विजय काळे यांनी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या पदाधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. यावेळी निरीक्षक सुमित डोंगरे, परेश मोरे, विशाल इंगोले, परशुराम जाधव, फिरोज खान, अशोक फरताळे, मनोज दांगट, दिगंबर गर्जे, बी. एस. मसवले, रमेश गंगाधरे, कान्हा आखाडे, अनंता कुटे, शहादेव तांदळे, व्ही. एस. काळे, रामचंद्र लाटे, उल्हास रकटे व रामदास गाडे उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS