Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी

४० विद्यार्थी किरकोळ जखमी

संगमनेर प्रतिनिधी - संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची मा

भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू
चंद्रपूर मध्ये एक भीषण अपघात.
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

संगमनेर प्रतिनिधी – संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राहुरीहून सकाळी संगमनेरच्या दिशेने येत असताना पिंपरणे गावाच्या शिवारात हा अपघात झाला. या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थीच होते. हे सर्वजण संगमनेरला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेरला आणण्यात आले आहे. एसटी बस मधून संगमनेरच्या दिशेने येणारे हे सर्वच विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी झाले असल्याची माहिती मिळते.

पालकांनी घाबरून जाऊ नये – दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला आणण्यात आले असून विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी असल्याची व त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सकाळी झालेल्या या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच पोलीस प्रशासन या संदर्भात पुढील तपास करत असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

COMMENTS