श्रीगोदा : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती घडवून आणली.विद्यार्थ्यांनी पालखी आणि आकर्षक रथाची सजावट करून गावातून दिंडी काढली. टाळमृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भजनी मंडळाच्या सुरेल तालावर निघालेल्या या दिंडीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. विविध संत, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीचे आकर्षण वाढवले. गाव परिसरात जणू प्रती पंढरीचे वातावरण निर्माण झाले होते.दिंडी मार्गावर गावातील महिलांनी आपल्या घरासमोर सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत केले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत या उपक्रमाचे स्वागत केले. त्यामुळे धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक ऐक्य आणि संस्कारांची जपणूक करणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहिला.या दिंडी सोहळ्यात विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेबद्दलची आस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यालय दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेत असते. वृक्षारोपण, गाव स्वच्छता व सौंदर्यीकरण यांसारख्या उपक्रमांतही विद्यालयाचा उल्लेखनीय सहभाग राहिला असून, त्यामुळे सर्व स्तरांतून विद्यालयाचे कौतुक होत आहे.दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर जगताप यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS