Homeकृषी

तीन बिबट्यांची निघोज परिसरात दहशत; वनविभागाने त्वरित पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी

निघोज: परिसरातील तुकाई वस्ती परिसरातील सुरकुंडे वस्ती येथे बुधवारी (दि. २२) रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने नि

कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर
विकासाच्या शर्यतीत कर्जत-जामखेड मागे राहू देणार नाही: सभापती प्रा. राम शिंदे; योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा बळी, दहशतीनं मिळेना मजूर: शेतकरी हवालदिल

निघोज: परिसरातील तुकाई वस्ती परिसरातील सुरकुंडे वस्ती येथे बुधवारी (दि. २२) रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने निघोज व परिसरात तीव्र घबराट पसरली आहे. या बिबट्यांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निघोज परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. यापूर्वी रामवाडी परिसरात बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला होता, तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वासरांवर हल्ला केला होता. याशिवाय लंके वस्ती, बोदगे वाडी, कवाद वस्ती परिसरातही बिबटे सातत्याने फिरताना दिसून येत आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून दिले जात नसल्याची संतप्त तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

तुकाई वस्ती परिसर हा दाट लोकवस्तीचा भाग असून जवळच कन्हैया दूध उद्योग समूह आहे. निघोज-शिरुर मुख्य रस्त्यावर असलेल्या या परिसरात एकाच वेळी तीन बिबटे फिरताना दिसल्याने नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनसंरक्षक विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरे लावावेत व बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण निघोज परिसरातून होत आहे.

COMMENTS