Homeताज्या बातम्या

देवळाली प्रवरा येथील शाळेत ‘लोकशाहीचा’ प्रत्यक्ष अनुभव; मोबाईल ॲपद्वारे रंगली शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक!

देवळाली प्रवरा: लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावी या उद्देशाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पी.एम. श्

प्रशासनाचा ’कागदी’ सोहळा अन् प्रसिद्धीचा ’बडेजाव’; किनवटमधील महाशिबिरात पारदर्शकतेचा बोजवारा!
देवळाली प्रवरा जिल्हा बँकेतील रोखपालच्या बदलीची मागणी; ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक दिल्यास शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज

देवळाली प्रवरा: लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावी या उद्देशाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. निवडणुकीची घोषणा, उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान, मतमोजणी आणि निकाल अशी संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष राबवत ईव्हीएमसारख्या मोबाईल अँपद्वारे शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.

शनिवार (१८ जुलै) रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. पात्र ठरलेल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर २२ जुलैपर्यंत जोरदार प्रचार रंगला. गुरुवारी (२३ जुलै) सकाळी प्रार्थनेनंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.

शाळेतील २६३ मतदारांपैकी २३८ विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यासाठी शाळेत चार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती, जिथे शिक्षकांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या भूमिका बजावल्या. ईव्हीएमप्रमाणे कार्य करणाऱ्या मोबाईल अँपवर उमेदवाराचे नाव व छायाचित्र पाहून विद्यार्थ्यांनी निळे बटण दाबत मतदान केले. मतदानानंतर येणाऱ्या ‘बीप’ आवाजामुळे मतदान यशस्वी झाल्याची खात्री विद्यार्थ्यांना मिळत होती, ज्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात घेतला.

मतमोजणीचे काम प्रभारी मुख्याध्यापिका नंदा थोरात यांच्यासह शिक्षिका मनिषा कुंभारकर, प्रतिभा बोबे, आयोध्या कुडके, सुप्रिया आंबेकर, सीमा ढाळे, ज्योती मस्कुले आणि अर्चना माळी यांनी पार पाडले.

मतमोजणीनंतर आर्यन गोरे याची शाळामुख्यमंत्री म्हणून निवड झाली. तर तन्वी उदावंत (शिक्षणमंत्री), आरोही पोळ (आरोग्यमंत्री), दर्शन वाळूंज (क्रीडामंत्री), साईप्रसाद उंडे (शिस्त व देखरेख मंत्री), दिव्या गंदमवार (स्वच्छतामंत्री), स्वराज तांगडे (पर्यावरणमंत्री) आणि शिवानी लोहार (सांस्कृतिक मंत्री) यांची विविध मंत्री पदांवर निवड करण्यात आली.

COMMENTS