Homeताज्या बातम्या

महिलेच्या कथित छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या; लातूर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

केज: केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हॉटेल व्यावसायिक प्रकाश भांडवलकर (वय ४१) यांनी लातूर येथील एका महिलेच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्

वारीतील २३ वर्षीय तरुण वाघोलीतून बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद

केज: केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हॉटेल व्यावसायिक प्रकाश भांडवलकर (वय ४१) यांनी लातूर येथील एका महिलेच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत युवकाचे वडील नानासाहेब भांडवलकर यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध लातूर येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रकाश नानासाहेब भांडवलकर (रा. सोनीजवळा, ता. केज) हे लातूर येथे हॉटेल व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी नोकरीनिमित्त माजलगाव येथे राहत असल्याने प्रकाश हे लातूरमध्ये एकटेच वास्तव्यास होते. दरम्यान, हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख रुपाली गरड उर्फ रुक्मिणी सुधीर अंधारे (रा. श्रीनगर, एम.आय.डी.सी., लातूर) या महिलेशी झाली. ओळख झाल्यानंतर संबंधित महिलेने प्रकाश भांडवलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून शिवीगाळ करणे व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या सततच्या त्रासाला कंटाळून भांडवलकर कुटुंबीयांनी १९ मे २०२६ रोजी केज पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार अर्ज दाखल केला होता.

१९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०४ वाजता रुपाली अंधारे हिने प्रकाशच्या वडिलांना फोन केला आणि “पप्पू शेठ गेला आहे, तुम्ही तात्काळ लातूरला या,” असे सांगून फोन कट केला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व कुटुंबीयांनी लातूरच्या श्रीनगर भागातील घरी धाव घेतली. तेथे पोहोचले असता प्रकाश भांडवलकर जमिनीवर मृतावस्थेत आढळले.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी मृत तरुणाचे वडील नानासाहेब मनोहर भांडवलकर (वय ६५, रा. सोनीजवळा, ता. केज) यांच्या फिर्यादीवरून रुपाली गरड उर्फ रुक्मिणी सुधीर अंधारे या महिलेविरुद्ध लातूर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय माधवराव पाटील पुढील तपास करत आहेत.

COMMENTS