Homeताज्या बातम्या

दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन

अकोले : दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला अकोले  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पाठिंबा दि

संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन
विजेच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणच्या गलथान कारभारावर ग्रामस्थ संतप्त
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष

अकोले : दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला अकोले  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार किसन लोहरे  यांना  याबाबत निवेदन देण्यात आले. 

महाराष्ट्रात व देशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना सरकार मात्र कुठलीही दाद देत नाही. या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होऊ नये व विद्यार्थ्यांना आपलं भविष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ नये यासाठी विविध मागण्या घेऊन हे  निवेदन राष्ट्रवादी  काँग्रेस  पक्षाच्या वतीने देण्यात आले . यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, विनोद हांडे, बाळासाहेब भांगरे, अमित नाईकवाडी, उमेश देशमुख, देवराम माने, भाऊ पाटील तळेकर, पोपट  चौधरीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS