Homeताज्या बातम्या

नायगावात विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा

नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी उपोषणास बसलेले शास्त्रज्ञ व समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला प

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवगण महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा
Jantar Mantar Lathicharge | नांदेड-लातूर महामार्गावर रास्ता रोको; दिल्लीतील  लाठीचाऱ्याचे नांदेडमध्ये तीव्र पडसाद

नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी उपोषणास बसलेले शास्त्रज्ञ व समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायगाव तहसील कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मधील त्रुटींवर कठोर कारवाई करून पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची, पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याची तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहून त्वरित न्याय द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, शहराध्यक्ष माधव देवकर, विधानसभा कार्याध्यक्ष चाँद शेख नरसीकर, तालुका उपाध्यक्ष मुबीन शेख जिगळेकर, ओमकार पवार, बालाजी धुमाळ, आनंद कांबळे, नारायण पांचाळ, रावसाहेब वाघमारे, साईनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS