Homeताज्या बातम्या

नांदेड-हणेगाव बससेवेअभावी नागरिक त्रस्त; भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बसस्थानक प्रमुखांना निवेदन

हणेगाव: भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेड ते हणेगाव बससेवा (नाईट हॉल्ट) तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. हणेगाव हे कर्न

सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्‍यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी
गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश
Nanded Bus Stand, Nanded Bus Stand Road, Khadakpura, Nanded, Maharashtra,  431601

हणेगाव: भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेड ते हणेगाव बससेवा (नाईट हॉल्ट) तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. हणेगाव हे कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील अतिदुर्गम व दुर्लक्षित भागात असून, या परिसरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, व्यापारी, शेतकरी तसेच विविध शासकीय कामांसाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात नांदेडला प्रवास करतात.

हणेगाव हे देगलूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून, येथील लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. तसेच हणेगावशी आसपासची सुमारे २० ते २५ गावे जोडलेली आहेत. या गावांतील सर्वसामान्य नागरिक दररोज विविध कामांसाठी नांदेडला जातात. मात्र, सायंकाळी सातनंतर नांदेडहून हणेगावकडे एकही बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, रात्री घरी परतण्यासाठी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने देगलूर येथील बसस्थानक प्रमुख राठोड यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. निवेदनात नांदेड-हणेगाव नाईट हॉल्ट बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शंभून दादा वाघमारे, तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, तालुका उपाध्यक्ष भीमराव भुतनेरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS