Homeताज्या बातम्या

तंत्रशिक्षणात नवे पर्व; एआय आणि उद्योग अनुभवातून शिक्षक घडविण्याचा एमएसबीटीईचा संकल्प

नांदेड: तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी शिक्षक स्वतः अद्ययावत असणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घे

स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम
एअरबॅगचा अनपेक्षित स्फोट ठरला जीवघेणा; मीरा रोड परिसरात २५ वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू
भारतासाठी चिंताजनक बातमी! अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनकडून भारतीय जमिनीवर कब्जा; स्थानिक आदिवासींचा धक्कादायक दावा
Google AI Training for Maharashtra Teachers | ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षण

नांदेड: तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी शिक्षक स्वतः अद्ययावत असणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) राज्यातील तंत्रनिकेतन शिक्षकांसाठी व्यापक कौशल्यविकास कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमातून शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष उद्योगातील कामकाजाचा अनुभव मिळणार आहे.

प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स, इंडस्ट्री ४.० आणि ५.०, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन प्रणाली आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांना केवळ सैद्धांतिक माहितीच नव्हे, तर नव्या तांत्रिक प्रवाहांची व्यावहारिक समज विकसित होणार आहे.

याशिवाय शिक्षकांना आघाडीच्या औद्योगिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फेस्टो इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, सीआयपीईटी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, एल अँड टी स्किल ट्रेनर्स अकादमी, लॉरिझ न्युडसन इलेक्ट्रिकल आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांसारख्या उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, स्वयंचलित यंत्रणा आणि उद्योग व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना मिळणार आहे.

नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना देणे आणि उद्योगांच्या अपेक्षांनुसार तंत्रशिक्षणाची गुणवत्ता उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील दरी कमी करून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि रोजगारक्षम बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

COMMENTS