Homeताज्या बातम्या

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.विलास भुमरे उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे, तर उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिन

सांगवीच्या वीजप्रश्नांसाठी नगरसेविका मीनल पाटील यांचा पाठपुरावा; पालकमंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आदेश
विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी; दोषींना पाठीशी घातले जाणार नाही : पालकमंत्री अतुल सावे
स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
Chhatrapati Sambhajinagar District Bank: Vilas Bhumre President, Ramrao  Shelke

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे, तर उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या एकत्रित नेतृत्वातून बँकेच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांचा विश्‍वास अधिक दृढ करत सहकार क्षेत्रात बँक उल्लेखनीय कामगिरी करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रा. रमेश बोरणारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजनाताई जाधव, डॉ. दिनेश परदेशी, बँकेचे नवनिर्वाचित संचालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS