बाळासाहेबांच्या मुलाला त्रास हा भाजपचा कृतघ्नपणा ; नाना पटोले यांची टीका; उद्धव यांची खुर्ची खेचण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांच्या मुलाला त्रास हा भाजपचा कृतघ्नपणा ; नाना पटोले यांची टीका; उद्धव यांची खुर्ची खेचण्याचा प्रयत्न

’शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपाचा कृतघ्नपणा आहे.

तालुक्यातील घुमटवाडी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धाचे आयोजन
ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात l पहा LokNews24
राहुल गांधी मागासलेल्या समाजाचा अपमान करतात परंतु माफी मागण्यास तयार नाही – अनुराग ठाकुर 

मुंबई: / प्रतिनिधीः ’शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपाचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत,’ अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशार्‍यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचे काम भाजप करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झाले आहे,  असा आरोप त्यांनी केला. ’राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे; परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा कुटील डावसुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,’ असा विश्‍वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. ’महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु भाजपचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असे ते म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, की 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; पण भाजपविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही.

COMMENTS