Homeताज्या बातम्या

नीट, राम मंदिर देणगी प्रकरणावरून संसदेत गोंधळ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्‍नपत्रिका गैरव्यव

श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!
उद्धव ठाकरे करणार रामरक्षा आंदोलनराम मंदिरातील कथित देणगी चोरीवरून आक्रमक
 श्रीराम मंदिरातील घटनेची समितीद्वारे चौकशी : गोविंददेवगिरी
विरोधी पक्षांनी संसदेला ठप्प केले आहे, NEET, राम मंदिर वादावर चर्चा हवी आहे


नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्‍नपत्रिका गैरव्यवहार, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहार प्रकरण तसेच इतर मुद्द्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सततच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत या विषयावर तातडीची चर्चा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज पुढे जाऊ शकले नाही. लोकसभेतही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, श्रीराम मंदिरातील देणगी अपहार आणि इतर विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. काही सदस्य फलक घेऊन सभागृहात आले होते. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतच ठप्प झाले. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून या कालावधीत एकूण 19 बैठका होणार आहेत. या अधिवेशनात प्राप्तिकर सुधारणा विधेयक, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याशी संबंधित विधेयकांसह सात महत्त्वाच्या विधेयकांवर सरकारची भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS